Posts

Showing posts from July, 2017

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

माझा जन्म १९९६ चा..तसं मी लहानपणापासूनच अनेकजणांना "दादा"हा शब्द मोठ्या आदबीने एकमेकांना म्हणताना पाहिले आहे,त्याचे एकमेव कारण म्हणजेच...अजितदादा पवार..!!!!               खरंच आज मी दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हे लिहित आहे पन मी नेमकं अस काय लिहू कि जे सार्या महाराष्ट्राला माहित नाही कारण या माणसाची कार्यशैलीच अशी आहे कि जे केलं ते सगळ लोकांच्या डोळ्यादेखत...एक घाव आन् दोन तुकडं..स्वत:ला शेतकरी नेता म्हणवून घेणारे अनेक नेते आहेत (म्हणजे फ्लॉवर हातात घेऊन कोबी घ्या असे म्हणणारे राजू शेट्टी किंवा शेतकर्याचा फुसका आव आणणारे सदाभाऊ) पन वडिलांच्या निधनानंतर शेतात दारी धरणारे,गाया-म्हशींच्या धारा काढणार्या दादांना सबंध महाराष्ट्रानंच पाहिलंय...बारामती दूधसंघाची  विविध पदे असतील,छञपती कारखान्याचा संचालक असेल किंवा थेट राज्याचे उपमुख्यमंञीपद असेल म्हणजेच जे काही मिळवलंय ते हिम्मतीने.(तसं पाहिला तर पवारसाहेबांचा किती मोठा वारसा आहे आणि आपल्या राज्यात स्वत:ला संघर्ष... वगैरे वगैरे बिरूद लावणारे कितीतरी थेट मंञी झालेत.असो) तो एक विचारच आहे कि कोणत...

संघर्षयोद्धा धनुभाऊ

तसा मी पश्चिम महाराष्ट्रातला त्यामुळे मराठवाड्याच्या राजकारणाबद्दल कधीच इंटरेस्ट नसणारा एक शेतकर्याचा पोरगा,साहजिकच आमच्या भागातच इतक्या मोठमोठ्या मुलूखमैदानी तोफा आहेत की त्यांच्याभोवतीच सबंध राजकारण फिरतं त्यामुळे बाकीकडे कधीच डोकावू वाटलं नाही.पन  दहावीनंतरचे शिक्षण घ्यायला जेव्हा बाहेर पडलो तेव्हा हॉस्टेलमधील मराठवाड्याच्या मुलांकडून धनुभाऊ हे नाव पहिल्यांदाच एेकल.त्यामुळे धनंजय मुंडे या रसायनाबद्दल कुतूहल वाढत गेलं.या रसायनाच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आलाय हे उभ्या महाराष्ट्रानेच पाहिलंय मग ती त्यांची आयुष्यातील पहिली जि.प.निवडणूक का असेना,म्हणजे त्यावेळी स्वत:चा हक्काचा जि.प.गट सोडून काही कारणास्तव दुसर्या गटातून लढावे लागले होते आणि याच पहिल्या निवडणूकीच्या आखाड्यातून धनंजय मुंडेचा "धनुभाऊ" झाला होता.विशेष म्हणजे तेव्हापासूनच या गड्याला "संघर्षयोद्धा" हे बिरूद लागल होत.गड्याचा हा अफाट कार्यप्रवास पाहून नेतृत्वानं त्यांना भाजयुमोचं प्रदेशउपाध्यक्षपद दिलं,आणि एकेकाळी या गड्याने सध्याच्या मुख्यमंञ्याचे देखील नेतृत्व केले होते,पन जे काही मिळालं ते फक्त संघर्षाने...

मी कोपर्डीची श्रद्धा बोलतेय

नमस्कार,मी श्रद्धा बोलतेय....हो तीच नगरच्या कोपर्डीतली श्रद्धा..आज मला जगातून जाऊन १ वर्ष पुर्ण झालंय.म्हणतात ना आत्मा हा अमर असतो,मी जग सोडलेल असलं तरीही माझा आत्मा अजून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.कस अगदी छान  दिवस चालले होते.रोज आईच्या हातच कालवण-भाकरी,बाच्या मायेचा आधार,मैञिणींबरोबर खेळायची-बागडायची...कदाचित हे माझ सगळं छान नियतीला मान्य नसावं,नेमक मी काय इतक मोठ पाप केलत की माझ्यासोबत हे अस घडल..नेहमीप्रमाणे शाळेतून येऊन हातपाय धूतले होते अभ्यासालाच बसणार होते इतक्यात आई म्हणाली बाळा तेवढी दुकानातून साखर आणून दे गं...(कदाचित मी अभ्यासच करायला हवा होता,म्हणजे हे सगळ टळलं असत)मग सायकल काढली न आई-बापाला जाताना "अखेरचा" टा-टा करून गेली.आणि पुढे बाकी सार घडलेलं आपणास माहित असेलच...                   मी गेल्यानंतर आई-बाच्या काळजाचा ठोका चुकला,खर त्या  माझ्या माऊलीन काय पाप केलंत जो देवा त्यांना तू असा दिवस दाखवला..मी गेल्यानंतर अनेक जण भेटायला आले,अनेक मंञ्यांनी आश्वासन दिली..आई-बापाच्या डोळ्यातंल पानी पुसलं पन परत साध डोकवायला देखील...