Posts

युथ आयकॉन - रोहितदादा पवार

               तसं पाहिल तर  बारामतीच पवार कुटूंब म्हणजे महाराष्ट्रालाच काय पन सबंध भारताला माहित असलेल एक बहूआयामी कुटूंब.म्हणजे साध्या गरीबातल्या गरीब बांधावरच्या माणसापासून ते पंचतारांकित,झगमगत्या,चंदेरी दुनियेला माहित असलेल हे कुटूंब.शरद पवार नावाची व्यक्ती कुणाला माहित नाही हो?? एक खूप मोठ्या पर्वताएवढ नाव,जशा पर्वताच्या छायेत छोट्यामोठ्या टेकड्या असतात तसेच हे कुटूंब.या कुटूंबाच राजकीय वलय इतकय कि अगदी "राजकारणाची पंढरी"हे बिरूद सहज लागू होते.भारताला पवारसाहेब,सुप्रियाताई माहितीयेत,राज्याला अजितदादा माहितीयेत..अगदी तसच हळूहळू पवार कुटूंबातून एक तरूण नेतृत्व म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायच तर युथ आयकॉन उदयाला येतय..रोहितदादा पवार           शरद पवारसाहेब याच नावात सर्व आलं,म्हणजे केवळ हे नाव जरी पाठी असल तरी "वजन"पडत,त्यात रोहितदादा तर सायबांचे नातू,त्यामुळे जे काही मिळवायचय ते सहजही मिळाल असत पन रोहितदादांकडे पाहून एक गोष्ट ध्यानात येते "पद,प्रतिष्ठा वारस्याने जरी मिळत असले तरी कर्तृत्व स्वतःच्या मनगटावर दाखवायच...

जितेंद्र आव्हाड-एक सच्चा पुरोगामी

हा महाराष्ट्र...याची बहुतांश ओळख सांगायची म्हटल तर हा महाराष्ट्र शाहू-फूले-आंबेडकरांचा..अर्थात सर्वसामान्य बहुजनांचा महाराष्ट्र..         महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६०ला झाली,आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सह्याद्रीपुञ यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली..काळानुरूप यशवंतराव (थोरले साहेब) गेले आणि त्यांचा वारसा मानसपुञ लोकनेते शरद पवारसाहेबांकडे आला..शरद पवारसाहेब म्हणजे पुरोगामी नेतृत्व,शाहू-फूले-आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणार व्यक्तिमत्व..जसे स्व.यशवंतरावांनी पवारसाहेबांसारखे बरेच नेते घडविले तसेच नेते पवारसाहेबांनीही घडवलेच अर्थात सगळ्यांची नाव घेण शक्य नाही,त्यांची यादी मोठीय,तरीही पवारसाहेबांच्या ज्वलंत विचारांची,पाईक,निष्ठावान लोकांपैकी डॉ.जितेंद्र आव्हाड हे एक नाव..           जितेंद्र आव्हाड यांच वर्णन सांगायच झाल तर एक दबंग नेता,आक्रमक नेता म्हणजे कधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा नेता,कधी जनतेसाठी कुणाचीही पर्वा न करता विधानसभेत शर्टच्या "भाया"वर करणारा नेता,सरकारच्या विरोधात एकटा किल्ला लढवून पाकच्य...

असे किती धर्मा पाटील हवेत...

प्रिय राम सातपुते, साष्टांग नमस्कार आणि तुमच्या अतिविकसित बुद्धीला प्रथम सलाम...            अंगात सफेद सदरा,डोक्यावर गांधी टोपी आणि वयोमानानुसार (वय९४) तोंडावर आलेल्या सुरकुत्या पाहून कुणालाही दया येणार हे वर्णन..माञ हेच वर्णन असणारा एक व्यक्ती जेव्हा खुद्द मंञालयातच विष पितो ही फक्त कल्पना केल्यानंतरच तळपायाची आग मस्तकात जाते आणि डोळ्यात आपसूकच पाणी येते अर्थात त्यासाठी त्याच व्यक्तीच्या पोटी जन्म घेतला नसेल तरीही..           रामदादा २०१५ साली औष्णिक प्रकल्पासाठी सरकारने धर्मा पाटील यांची ५ एकर बागायती जमीन केवळ ४ लाखात घेतली,तुम्हीच सांगा तुम्ही स्वतःची १ इंच जागा तरी सोडली असती का?धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यापासून राज्यातली जनता सरकारला प्रश्न विचारत आहेत,बिचारे मुख्यमंत्री महोदय तर दावोस सारख्या छोट्याशा खेडेगावात अतिमहत्वाच्या कामात व्यस्त आहेत.जनतेने खूप पाठपुरावा केल्यानंतर फक्त चंद्रकांत बावनकुळेंनी  २ उत्तरे दिली ती पन खूप संताप येतील अशी.अशा अवस्थेत जनतेची दखल घेतली न गेल्यामुळे सुप्रियाताई सुळेंनी एक खासदा...

शिवाजीराव गायकवाड ते रजनीकांत.. THE THALAIVAA

कंडक्टर ते सुपरस्टार..            सध्याच्या जगात इंटरनेटच्या जमान्यात एखाद्या सोशल साइटवर साधे ५-१० हजार फॉलोअर झाले तरी माज दाखवणारे भरपूर वाढलेत,मग समोरच्या व्यक्तीने Hii  वगैरे जरी मेसेज केला तरी त्याला रिप्लाय देऊ वाटत नाही..इतकेच काय तर गावातल्या साध्या ग्रा.पं.मधील  सदस्यापासून ते  शहरातल्या नगरसेवकापर्यंत "मी " पणाचा माज सगळीकडे दिसून येतो..खरतर जेव्हा तो व्यक्ती उपस्थित नसतो तेव्हा लोक त्याच्याबद्दल जे बोलतात तो माझ्या व्यक्तीचा खरा आदर असतो,पन या महाभागांना पाठीमागून शिव्याच भेटतात हे आपण अनुभवतो..खरंच एखादा माणूस जेव्हा सर्वोच्च शिखरावर असतो  तेव्हा त्याला शिव्याशाप वगैरे देणारे भरपूर असतात, अपावादात्मक काही उदाहरणे आहेत अर्थात शिवाजीराव गायकवाडांसारखे अर्थात थलैवा रजनीकांत यांच्यासारखे... आशिया खंडातला जॅकी चेन नंतरचा सर्वात मोठा स्टार रजनी बाहेर लोकांमध्ये फिरताना आवर्जून कुठलाच मेकप साधा गॉगल किंवा केसांचा विग न घालता, साध्या माणसाप्रमाणे फिरतो. रोबोट पिचरच्या प्रदर्शनाच्या वेळेस अमिताभची तोंड भरून स्तुती करणाऱ्या रजनीचा...

पवारसाहेब झिंदाबाद

                सध्याचा   दिल्लीतला महाराष्ट्र                       * शरदचंद्र पवार*                तमाम  देशातील जनतेच्या कपाळावर बारा वाजले असताना बारा बारा १९४० ला बारामतीत शारदाबाईंच्या आणि गोविंदरावांच्या पोटी जन्म घेऊन जनतेच्या कपाळावरील कोडं सोडवून तत्कालीन राजकारण्यांपासून ते आजतागायतच्या राजकारण्यांच्या कपाळावर 'बारा'वाजवणारे एक रसायन म्हणजेच 'शरद गोविंदराव पवार' म्हणजेच आपले लाडके साहेब...                 शरद पवार हे नाव १९६७ सालापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात सतत पुढे राहिलेलं नाव आहे. त्यांच्या नावाचं  गारूड कित्येक वर्ष महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जनतेच्या मनावर आहे. जनतेने त्यांना चार वेळा राज्याच्या सर्वोच्च पदावर आरूढ केलं. माझ्या पिढीने यशवंतराव ऐकले, वाचले पण जवळून पाहिले अथवा अनुभवले नाहीत. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाकडे पाहता पाहता माझी पिढी शरद पवा...

मा.सौ.सुनेञावहिनी अजितदादा पवार

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

माझा जन्म १९९६ चा..तसं मी लहानपणापासूनच अनेकजणांना "दादा"हा शब्द मोठ्या आदबीने एकमेकांना म्हणताना पाहिले आहे,त्याचे एकमेव कारण म्हणजेच...अजितदादा पवार..!!!!               खरंच आज मी दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हे लिहित आहे पन मी नेमकं अस काय लिहू कि जे सार्या महाराष्ट्राला माहित नाही कारण या माणसाची कार्यशैलीच अशी आहे कि जे केलं ते सगळ लोकांच्या डोळ्यादेखत...एक घाव आन् दोन तुकडं..स्वत:ला शेतकरी नेता म्हणवून घेणारे अनेक नेते आहेत (म्हणजे फ्लॉवर हातात घेऊन कोबी घ्या असे म्हणणारे राजू शेट्टी किंवा शेतकर्याचा फुसका आव आणणारे सदाभाऊ) पन वडिलांच्या निधनानंतर शेतात दारी धरणारे,गाया-म्हशींच्या धारा काढणार्या दादांना सबंध महाराष्ट्रानंच पाहिलंय...बारामती दूधसंघाची  विविध पदे असतील,छञपती कारखान्याचा संचालक असेल किंवा थेट राज्याचे उपमुख्यमंञीपद असेल म्हणजेच जे काही मिळवलंय ते हिम्मतीने.(तसं पाहिला तर पवारसाहेबांचा किती मोठा वारसा आहे आणि आपल्या राज्यात स्वत:ला संघर्ष... वगैरे वगैरे बिरूद लावणारे कितीतरी थेट मंञी झालेत.असो) तो एक विचारच आहे कि कोणत...