Posts

Showing posts from January, 2018

असे किती धर्मा पाटील हवेत...

प्रिय राम सातपुते, साष्टांग नमस्कार आणि तुमच्या अतिविकसित बुद्धीला प्रथम सलाम...            अंगात सफेद सदरा,डोक्यावर गांधी टोपी आणि वयोमानानुसार (वय९४) तोंडावर आलेल्या सुरकुत्या पाहून कुणालाही दया येणार हे वर्णन..माञ हेच वर्णन असणारा एक व्यक्ती जेव्हा खुद्द मंञालयातच विष पितो ही फक्त कल्पना केल्यानंतरच तळपायाची आग मस्तकात जाते आणि डोळ्यात आपसूकच पाणी येते अर्थात त्यासाठी त्याच व्यक्तीच्या पोटी जन्म घेतला नसेल तरीही..           रामदादा २०१५ साली औष्णिक प्रकल्पासाठी सरकारने धर्मा पाटील यांची ५ एकर बागायती जमीन केवळ ४ लाखात घेतली,तुम्हीच सांगा तुम्ही स्वतःची १ इंच जागा तरी सोडली असती का?धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यापासून राज्यातली जनता सरकारला प्रश्न विचारत आहेत,बिचारे मुख्यमंत्री महोदय तर दावोस सारख्या छोट्याशा खेडेगावात अतिमहत्वाच्या कामात व्यस्त आहेत.जनतेने खूप पाठपुरावा केल्यानंतर फक्त चंद्रकांत बावनकुळेंनी  २ उत्तरे दिली ती पन खूप संताप येतील अशी.अशा अवस्थेत जनतेची दखल घेतली न गेल्यामुळे सुप्रियाताई सुळेंनी एक खासदा...