संघर्षयोद्धा धनुभाऊ
तसा मी पश्चिम महाराष्ट्रातला त्यामुळे मराठवाड्याच्या राजकारणाबद्दल कधीच इंटरेस्ट नसणारा एक शेतकर्याचा पोरगा,साहजिकच आमच्या भागातच इतक्या मोठमोठ्या मुलूखमैदानी तोफा आहेत की त्यांच्याभोवतीच सबंध राजकारण फिरतं त्यामुळे बाकीकडे कधीच डोकावू वाटलं नाही.पन दहावीनंतरचे शिक्षण घ्यायला जेव्हा बाहेर पडलो तेव्हा हॉस्टेलमधील मराठवाड्याच्या मुलांकडून धनुभाऊ हे नाव पहिल्यांदाच एेकल.त्यामुळे धनंजय मुंडे या रसायनाबद्दल कुतूहल वाढत गेलं.या रसायनाच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आलाय हे उभ्या महाराष्ट्रानेच पाहिलंय मग ती त्यांची आयुष्यातील पहिली जि.प.निवडणूक का असेना,म्हणजे त्यावेळी स्वत:चा हक्काचा जि.प.गट सोडून काही कारणास्तव दुसर्या गटातून लढावे लागले होते आणि याच पहिल्या निवडणूकीच्या आखाड्यातून धनंजय मुंडेचा "धनुभाऊ" झाला होता.विशेष म्हणजे तेव्हापासूनच या गड्याला "संघर्षयोद्धा" हे बिरूद लागल होत.गड्याचा हा अफाट कार्यप्रवास पाहून नेतृत्वानं त्यांना भाजयुमोचं प्रदेशउपाध्यक्षपद दिलं,आणि एकेकाळी या गड्याने सध्याच्या मुख्यमंञ्याचे देखील नेतृत्व केले होते,पन जे काही मिळालं ते फक्त संघर्षानेच.
सध्याचे पंतप्रधान नरेद्र मोदींना देखील महाराष्ट्रात पहिल्यांदा कुणी आणल असेल तर ते धनुभाऊनेच(२००८पुणे मेळावा).आता हा उसतोड मजुराचा गडी राजकारणातल्या चाणक्याच्या सहवासात राहून कौशल्य हस्तगत करेल यात काही शंकाच नाही.धनुभाऊ उद्या आयुष्याच्या नव्या वर्षात पदार्पण करीत आहेत,पन वडिलांच्या स्वर्गवासाच्या धक्क्यातून सावरले नाहीत,त्यामुळे या रसायनाला मी जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छित नाही.धनंजय मुंडे या वादळाच्या राजकीय जीवनास लाख-लाख सदिच्छा..!!!!!

खूपच छान लिहतोयस सनी ....👌👌👌
ReplyDeleteआभार सर
Delete