असे किती धर्मा पाटील हवेत...

प्रिय राम सातपुते,
साष्टांग नमस्कार आणि तुमच्या अतिविकसित बुद्धीला प्रथम सलाम...
           अंगात सफेद सदरा,डोक्यावर गांधी टोपी आणि वयोमानानुसार (वय९४) तोंडावर आलेल्या सुरकुत्या पाहून कुणालाही दया येणार हे वर्णन..माञ हेच वर्णन असणारा एक व्यक्ती जेव्हा खुद्द मंञालयातच विष पितो ही फक्त कल्पना केल्यानंतरच तळपायाची आग मस्तकात जाते आणि डोळ्यात आपसूकच पाणी येते अर्थात त्यासाठी त्याच व्यक्तीच्या पोटी जन्म घेतला नसेल तरीही..
          रामदादा २०१५ साली औष्णिक प्रकल्पासाठी सरकारने धर्मा पाटील यांची ५ एकर बागायती जमीन केवळ ४ लाखात घेतली,तुम्हीच सांगा तुम्ही स्वतःची १ इंच जागा तरी सोडली असती का?धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यापासून राज्यातली जनता सरकारला प्रश्न विचारत आहेत,बिचारे मुख्यमंत्री महोदय तर दावोस सारख्या छोट्याशा खेडेगावात अतिमहत्वाच्या कामात व्यस्त आहेत.जनतेने खूप पाठपुरावा केल्यानंतर फक्त चंद्रकांत बावनकुळेंनी  २ उत्तरे दिली ती पन खूप संताप येतील अशी.अशा अवस्थेत जनतेची दखल घेतली न गेल्यामुळे सुप्रियाताई सुळेंनी एक खासदार म्हणून जाब विचारला तर यात गैर काय??खरंच मला सांगा बर धर्मा पाटीलांची ५ एकर ४ लाखात घेणारे तुम्हाला नाही दिसले का?
             रामदादा तुम्ही अभाविप चे कार्यकर्ते आहात त्यामुळे मी सगळ समजू शकतो पन  गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा झालेला खेळखंडोबा असेल किंवा २३००० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय असेल अशा निर्णयांवेळी आपल्यातला नेमका विद्यार्थी कुठे गेला होता?(अजूनही तो जाग्यावर आलाय अस वाटत नाही)..तुम्हाला लवासा दिसला पन अजितदादांनी विकसित केलेल पिंपरी-चिंचवड कस दिसल नाही ओ??राहीला विषय तुम्ही पवारसाहेबांवर जे लिहिलय त्याच्यावर जास्त मी लिहित नाही कारण तुमचे-आमचे वडील जेव्हा पाळण्यात होते तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री झाले होते,त्यामुळे सांगाच कि वडिलांना न कळणारे पवारसाहेब मुलाला कसे कळतील??तुमचा व्यवसाय मला माहीत नाही पन जर शेतकरी असाल तर फक्त आपल्या घरीच विचारा कि त्यांच्या जन्मापासून राज्यात कधी शेतकरी संप झाला होता का?? सगळी उत्तरे तुम्हाला  निरूत्तर करून टाकतील..असो शेवटी मी जास्त लिहित नाही कारण पवारांना समजून घेण ही येड्यागबाळ्याची काम नव्हे हे तुम्हालाही ठाऊक असेलच..
          पुनश्च तुमच्या अतिविकसित बुद्धीला सलाम करतो..!!!
         तुमचाच धाकटा भाऊ
               ( स.र.गाडे)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

संघर्षयोद्धा धनुभाऊ