मी कोपर्डीची श्रद्धा बोलतेय

नमस्कार,मी श्रद्धा बोलतेय....हो तीच नगरच्या कोपर्डीतली श्रद्धा..आज मला जगातून जाऊन १ वर्ष पुर्ण झालंय.म्हणतात ना आत्मा हा अमर असतो,मी जग सोडलेल असलं तरीही माझा आत्मा अजून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.कस अगदी छान  दिवस चालले होते.रोज आईच्या हातच कालवण-भाकरी,बाच्या मायेचा आधार,मैञिणींबरोबर खेळायची-बागडायची...कदाचित हे माझ सगळं छान नियतीला मान्य नसावं,नेमक मी काय इतक मोठ पाप केलत की माझ्यासोबत हे अस घडल..नेहमीप्रमाणे शाळेतून येऊन हातपाय धूतले होते अभ्यासालाच बसणार होते इतक्यात आई म्हणाली बाळा तेवढी दुकानातून साखर आणून दे गं...(कदाचित मी अभ्यासच करायला हवा होता,म्हणजे हे सगळ टळलं असत)मग सायकल काढली न आई-बापाला जाताना "अखेरचा" टा-टा करून गेली.आणि पुढे बाकी सार घडलेलं आपणास माहित असेलच...
                  मी गेल्यानंतर आई-बाच्या काळजाचा ठोका चुकला,खर त्या  माझ्या माऊलीन काय पाप केलंत जो देवा त्यांना तू असा दिवस दाखवला..मी गेल्यानंतर अनेक जण भेटायला आले,अनेक मंञ्यांनी आश्वासन दिली..आई-बापाच्या डोळ्यातंल पानी पुसलं पन परत साध डोकवायला देखील कोण आल नाही,का वो...खरच पोरीच्या अब्रूची किम्मत एवढी कमी झालीय का...राजकारणाच्या नादात आपली संस्कृती आणि मानसिकता  इतकी बरबटलीय आणि माणूसकी स्वार्थीपणाच्या गॅरेजमध्ये धूळ खात पडलीय का??आज मला जाऊन १ वर्ष झालंय माझ्या आई आणि बा ला जे सोसावं लागलंय ते माझ्या दुसर्या कोणत्याही बहिनीच्या वाट्याला येऊ नये,म्हणून मी महाराष्ट्रालाच नव्हे तर समद्या देशाला साद घालतेय....
.......................तूमचीच श्रद्धा
                   Blog By Sunny Gade(Baramati)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

असे किती धर्मा पाटील हवेत...

संघर्षयोद्धा धनुभाऊ