शिवाजीराव गायकवाड ते रजनीकांत.. THE THALAIVAA

कंडक्टर ते सुपरस्टार..

           सध्याच्या जगात इंटरनेटच्या जमान्यात एखाद्या सोशल साइटवर साधे ५-१० हजार फॉलोअर झाले तरी माज दाखवणारे भरपूर वाढलेत,मग समोरच्या व्यक्तीने Hii  वगैरे जरी मेसेज केला तरी त्याला रिप्लाय देऊ वाटत नाही..इतकेच काय तर गावातल्या साध्या ग्रा.पं.मधील  सदस्यापासून ते  शहरातल्या नगरसेवकापर्यंत "मी " पणाचा माज सगळीकडे दिसून येतो..खरतर जेव्हा तो व्यक्ती उपस्थित नसतो तेव्हा लोक त्याच्याबद्दल जे बोलतात तो माझ्या व्यक्तीचा खरा आदर असतो,पन या महाभागांना पाठीमागून शिव्याच भेटतात हे आपण अनुभवतो..खरंच एखादा माणूस जेव्हा सर्वोच्च शिखरावर असतो  तेव्हा त्याला शिव्याशाप वगैरे देणारे भरपूर असतात, अपावादात्मक काही उदाहरणे आहेत अर्थात शिवाजीराव गायकवाडांसारखे अर्थात थलैवा रजनीकांत यांच्यासारखे...
आशिया खंडातला जॅकी चेन नंतरचा सर्वात मोठा स्टार रजनी बाहेर लोकांमध्ये फिरताना आवर्जून कुठलाच मेकप साधा गॉगल किंवा केसांचा विग न घालता, साध्या माणसाप्रमाणे फिरतो. रोबोट पिचरच्या प्रदर्शनाच्या वेळेस अमिताभची तोंड भरून स्तुती करणाऱ्या रजनीचा विनयशील पणा उठून दिसतो.
                एखादा पिच्चर फ्लॉप गेला तर त्याच मानधन परत करणारा रजनी किंवा ज्या सहकारी मित्राने सिने सृष्टीत यायला मदत केली म्हणून त्याच्या घरी आतासुद्धा तितक्याच आपुलकीने आवर्जून जाणारा रजनी असो त्याचा माणूस पणा आजही एवढ्या प्रसिद्धीच्या यशाच्या झोतात तेवढाच टिकून असलेला दिसून येतो, कदाचित महाराष्ट्राच्या मराठी मातीचा तो गुणधर्म असावा..
      रजनीच्या मोठ्या मनाचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत.त्याची लोकप्रियता नुसत्या त्याच्या स्टाईल मूळे नाही तर त्याच्या पडद्याबाहेर वास्तविक जीवनात असणाऱ्या प्रामाणिकपणा मूळ देखील आहे. रजनीकांत बद्दल वाईट बोलणारा तक्रार करणारा एकही सहकारी कलाकार नाही.
हाच त्यांचा प्रामाणिक पणा आणि विनयशीलता त्याला इतर नेते , नट लोकांपासून वेगळा करून टाकतो..म्हणजे एक मराठी माणूस जेव्हा इंटरनॅशनल लोकांचा "हिरो'बनतो तेव्हा अजूनही आमचा ऊर भरून येतो.
              रजनी लोकांवर मनापासून प्रेम करतो आणि लोक त्याच्यावर मनापासून प्रेम करतात हे सगळं खूप सोपं सहज आहे.पण क्लिष्ट राजकीय समीक्षे मध्ये आकंठ बुडालेल्या लोकांना ही सहजता समजणं अशक्य आहे. कारण त्यांना फक्त 'हायटेक जीवन'ठाऊक असतं...
         रजनीकांत मूळ कुठले आहेत किंवा त्यांच्या मु़ळच्या गोष्टी सांगताना मी अनेकांना गहिवरलेलं पाहिलय..कबालीसारख्या पिच्चरच्या वेळी लोकांनी त्याच्या पुतळ्याला दूधाचा अभिषेक घालताना पाहिलंय..रजनीकांत यांच्याकडे पाहिल्यावर मोकार भाव खाणार्या "बॉलीवूड'मधल्या कलाकारांना त्यांच अप्रूूपही वाटत असेल पन व्यक्त करायला लाजही वाटत असेल..माझ्या मते अशा वेळी त्यांना रजनीने पूराच्या वेळी किंवा अनेक आपत्तींवेळी केलेली मदत  आणि रजनीचा मनाचा मोठेपणा दिसत असेल..  रजनीने त्याच्यातला सामान्य माणूस आजपर्यंत जपलाय आणि राजकारणात सुद्धा तो त्याच सामान्य माणसाच्या आवेशात उतरून काम करू लागला तर इतर राजकीय पक्षांना नक्कीच जड जाऊ शकतो. आणि हा मराठी माणूस स्वार्थी राजकारण्यांना पुरून उरेल यात तीळमाञ शंका नाही...रजनीबद्दल शब्द अपुरे पडतायेत तूर्तास त्यांना ग्रँड सॅल्यूट..🙏🙏

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

असे किती धर्मा पाटील हवेत...

संघर्षयोद्धा धनुभाऊ