जितेंद्र आव्हाड-एक सच्चा पुरोगामी

हा महाराष्ट्र...याची बहुतांश ओळख सांगायची म्हटल तर हा महाराष्ट्र शाहू-फूले-आंबेडकरांचा..अर्थात सर्वसामान्य बहुजनांचा महाराष्ट्र..
        महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६०ला झाली,आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सह्याद्रीपुञ यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली..काळानुरूप यशवंतराव (थोरले साहेब) गेले आणि त्यांचा वारसा मानसपुञ लोकनेते शरद पवारसाहेबांकडे आला..शरद पवारसाहेब म्हणजे पुरोगामी नेतृत्व,शाहू-फूले-आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणार व्यक्तिमत्व..जसे स्व.यशवंतरावांनी पवारसाहेबांसारखे बरेच नेते घडविले तसेच नेते पवारसाहेबांनीही घडवलेच अर्थात सगळ्यांची नाव घेण शक्य नाही,त्यांची यादी मोठीय,तरीही पवारसाहेबांच्या ज्वलंत विचारांची,पाईक,निष्ठावान लोकांपैकी डॉ.जितेंद्र आव्हाड हे एक नाव..
          जितेंद्र आव्हाड यांच वर्णन सांगायच झाल तर एक दबंग नेता,आक्रमक नेता म्हणजे कधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा नेता,कधी जनतेसाठी कुणाचीही पर्वा न करता विधानसभेत शर्टच्या "भाया"वर करणारा नेता,सरकारच्या विरोधात एकटा किल्ला लढवून पाकच्या साखरेची गोदामं पेटवणारा नेता,अर्थसंकल्पावेळी शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणा देऊन निलंबन झालेला नेता..पाञ बदलंली पन जितेंद्र आव्हाड "जितेंद्र आव्हाडच"राहिले..
            आघाडी सरकारच्या काळात पहिल्यांदा मंञी म्हणून शपथ घेताना ते पाणावलेले डोळे आणि फुरफुरणार्या नाकपुड्या पाहून त्यांच्यातल्या "भावनिक माणसाचं"दर्शन अवघ्या महाराष्ट्राला झालं होत..आणि त्याचवेळी त्यांनी पवारसाहेबांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता मनाला भावून गेली होती. हल्ली राजकारणात "निष्ठा" म्हणजे सडलेल्या अन्नासारखी झालीय अशावेळी
शरद पवारसाहेबांवर नितांत प्रेम,निष्ठा आणि श्रद्धा असणारा हा माणूस बर्याच "चिल्लरांना"आदर्श ठरतो.हा माणूस निधडा,मोकळाढाकळा आणि स्वतःशी मताशी ठाम असतो मग विरोधकांकडून झालेला हल्लाही तो हसत-हसत स्वीकारतो..
       आपल्या सभोवताली १०० विरोधक जरी असले तरी छाती ठोकून "हो,मी पवारसाहेबांचाच कार्यकर्ताय"..अस ठणकावून सांगणार्या जितेंद्र आव्हाड यांचा हा विशेष गुण मला खूप भावतो..असो लिहायला बरंचय...अशा या पुरोगामी विचारांच्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा...🌷🌷
शब्दांकन आणि शुभेच्छुक-सनी रमेश गाडे(बारामती)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

असे किती धर्मा पाटील हवेत...

संघर्षयोद्धा धनुभाऊ