युथ आयकॉन - रोहितदादा पवार
तसं पाहिल तर बारामतीच पवार कुटूंब म्हणजे महाराष्ट्रालाच काय पन सबंध भारताला माहित असलेल एक बहूआयामी कुटूंब.म्हणजे साध्या गरीबातल्या गरीब बांधावरच्या माणसापासून ते पंचतारांकित,झगमगत्या,चंदेरी दुनियेला माहित असलेल हे कुटूंब.शरद पवार नावाची व्यक्ती कुणाला माहित नाही हो?? एक खूप मोठ्या पर्वताएवढ नाव,जशा पर्वताच्या छायेत छोट्यामोठ्या टेकड्या असतात तसेच हे कुटूंब.या कुटूंबाच राजकीय वलय इतकय कि अगदी "राजकारणाची पंढरी"हे बिरूद सहज लागू होते.भारताला पवारसाहेब,सुप्रियाताई माहितीयेत,राज्याला अजितदादा माहितीयेत..अगदी तसच हळूहळू पवार कुटूंबातून एक तरूण नेतृत्व म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायच तर युथ आयकॉन उदयाला येतय..रोहितदादा पवार
शरद पवारसाहेब याच नावात सर्व आलं,म्हणजे केवळ हे नाव जरी पाठी असल तरी "वजन"पडत,त्यात रोहितदादा तर सायबांचे नातू,त्यामुळे जे काही मिळवायचय ते सहजही मिळाल असत पन रोहितदादांकडे पाहून एक गोष्ट ध्यानात येते "पद,प्रतिष्ठा वारस्याने जरी मिळत असले तरी कर्तृत्व स्वतःच्या मनगटावर दाखवायच असतं." रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत,ते सध्या पुण्याच्या जिल्हापरिषदेतही दणक्यात पोचलेत.जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यावर त्यांना तशी प्रचाराची गरजच नव्हती कारण "पवार"नावाचा "ब्रँड"त्यांच्यासोबत होता,कदाचित ते छान ए.सी.मध्ये बसून राहिले असते तरी सहज निवडून आले असते पन लोकांच्या दारात वडिलधार्या बायाबापड्यांच्यात जाऊन हातात हात घेऊन आपूलकीने विचारपूस करताना त्यांना पाहिलय,त्याच वेळी हा आपला माणूस हाय हीच जणू लोकभावना होती.जिल्हा परिषद सदस्याचे अधिकार,आवाका हा त्याच्या गटापुरताच पन रोहितदादा पवार त्याला खूप मोठे अपवाद आहेत,त्यांचे कार्य जणू महाराष्ट्राचेच "जिल्हा परिषद सदस्य"असल्यासारखे आहे.त्यांनी केवळ दीड वर्षातच स्वतःच्या गटातील कामे करून विविध संघटना आणि कंपन्यांना एकञित करत ५७ गावातून ७० हजार मीटर ओढाखोलीकरण केलय.अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार लोकांना महाशिबीराच्या माध्यामातून मदत केलीय.आता तर त्यांच्या कार्याची दखल घेत "इस्मा"नं त्यांना अध्यक्ष केल.
ज्या वयात सरंपचपदाची स्वप्नं पडावीत त्या वयात आंतरराष्ट्रीय साखर कारखानदारीच नेतृत्व करणं "नॉट अ जोक..म्हणूनच का आमचा युवक प्रेरणास्थान असा व्यक्ती नसावा?? या तरूणाला "लोकनेता" व्हायला उशीर लागणार नाही,याचसाठी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा...🌷🌷🌷🌷🌷
@SUNNY GADE

Comments
Post a Comment